Bhandara Rain Update : भंडाऱ्यात जोरदार पाऊस, शेतीला फटका :ABP Majha

Continues below advertisement

भंडाऱ्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस, नदी-नाले प्रवाहित भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी - नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची रात्री चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळं ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे.  

गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा (Heavy Rain)अंदाज आहे. तर मागील दोन दिवसांमध्ये भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram