TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 22 July 2024 : ABP Majha
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या.. अजितदादांनी देखील शाहांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरु , मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात.
मुंबईत आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
मुंबई लोकल नेहमीप्रमाणे उशिराने, मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा रेल्वे सेवेवर आजही काहीसा परिणाम, तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरु.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पूरही ओसरला.
कल्याण स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत,मुंबई आणि कर्जत कसारा कडे जाणाऱ्या लोकल उशिराने.
मुसळधार पावसामुळे कल्याण स्टेशन परिसर जलमय, पार्किंग समोरील रस्त्याला नदीचे स्वरूप, त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांचे हाल.
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनामध्ये काल रात्रापासून मुसळधार पाऊस, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप, सखल भागात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह कामाला जाणाऱ्यांचे हाल.
पालघर जिल्ह्याला आजपासून तीन दिवस यलो अलर्ट, गेले चार दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून सूर्या आणि वैतरणा नद्यांना पूर. धामणी धरण ५३ टक्के भरले.
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश.