Bhandara : भंडाऱ्यात गोशाळेत चारा-पाण्याविना 30 जानेवारांचा मृत्यू, संचालक पोलिसांच्या ताब्यात

Continues below advertisement

Death of animals: भंडाऱ्याच्या पवनी येथील गोशाळेत चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठवलं होते. मात्र, बळीराम गोशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं 30 जनावरे मृत पावली.

याप्रकरणी पवनी पोलिसांनी गोशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हतं. ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दरम्यान, कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत ठेवण्यात आलं होतं. मात्र, यातील 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram