Chhatrapati Sambhajinagar : पेपरफुटीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक

Continues below advertisement

जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजी नगर शहरातील वाल्मी नाका परिसरात विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलय. यावेळी मोठ्या संख्येने परीक्षार्थी विद्यार्थी हातात विविध प्रकारचे फलक घेऊन उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब पदाच्या परीक्षेत अमरावती येथील परीक्षा केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केलाय .त्यामुळे गोरगरीब, होतकरू आणि प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय झाला असल्याची खंत व्यक्त केलीय. त्यामुळे पार पडलेली जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून ती नव्याने फक्त TCS अधिकृत ION केंद्रावरच लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी ही परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram