FASTag KYC Update : 'हे' फास्टॅग 31 जानेवारीला होतील निष्क्रिय, आधी हे काम पूर्ण करा Auto News

जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि फास्टॅग (FASTag) वापरत असाल, तर थांबा..हा व्हीडिओ पाहूनच जा... फास्टॅग वापरायचं असेल तर तुम्हाला 31 जानेवारी आधी एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे, नाहीतर तुम्हाला फास्टॅग वापरता येणार नाही. ते काय काम आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा, National Highway Authority Of India ने सोमवारी 'वन व्हेईकल, वन फास्टॅग'उपक्रमाचा शुभारंभ केलाय. यासाठी फास्टटॅगचं केवायसी करणं कंप्लसरी करण्यात आलं आहे. केवायसी केलं नाही तर तुमच्याकडचा फास्टटॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट केला जाणार आहे. यानंतर फास्टॅगमध्ये पैसे शिल्लक असले तरीही पेमेंट होणार नाही. एवढच नाही तर टोलनाक्यावरही दंड भरावा लागणार आहे. फास्टॅग केवायसीसाठी 31 जानेवारी 2024 ही डेडलाईन देण्यात आली आहे अनेक वाहनांना एकच फास्टटॅग वापरणं किंवा एका विशेष वाहनांना अनेक फास्टटॅग जोडण्यापासून रोखणं हा 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' या उपक्रमाचा उद्देश आहे. 31 जानेवारीपर्यंत फास्टॅगचे केवायसी अपडेट न केल्यास ते ब्लॉक केलं जाईल. national highway authority of india ने 15 जानेवारीला नवी अधिसूचना जारी केली आहे. फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola