Pune Racket busted : हायप्रोफाईल वेश्या व्यवसायचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची मोठी कारवाई
उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पुण्यातील विमानतळ परिसरातून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका राजस्थानी हीरोइनसह दोन रशियन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. विमानतळ आणि कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये हा गोरख धंदा सुरू होता.. बुधवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली .