Hasina Dilshad Ahmed | 18 वर्षांच्या कैदेनंतर पाकिस्तानातून भारतात परतलेल्या हसीना बेगम यांचा मृत्यू
Continues below advertisement
औरंगाबाद : तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाल्यानंतर भारतात परतलेल्या हसीना दिलशाद अहमद यांचं आज (9 फेब्रुवारी) निधन झालं. औरंगाबादमध्ये त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा दफनविधीही आज पार पडला.
पासपोर्ट चोरीला गेलेल्या हसीना बेगम यांना पाकिस्तान पोलिसांनी गुप्तहेर समजून अटक केली होती. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नाने त्यांची तब्बल 18 वर्षांनंतर जेलमधून सुटका झाली होती. 26 जानेवारी 2021 रोजी त्या औरंगाबादला परतल्या होत्या. परंतु आयुष्यातील 18 वर्षे पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद राहिलेल्या हसीना बेगम यांना कुटुंबीयांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचं सुखही मिळालं नाही. पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर अवघ्या 14 दिवसांनी त्यांना मृत्यूने कवटाळलं.
Continues below advertisement