Navneet Rana vs Police : नवनीत राणांविरोधात निवृत्त पोलीस संघटना आक्रमक, आयुक्तांना दिलं निवेदन
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 01:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार नवनीत राणा यांच्या विरोधात निवृत्त पोलीस अधिकारी संघटना आता आक्रमक झाली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी पोलीस हे अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयावर दाखल होऊन त्यांनी पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना निवेदन दिलं ज्यात त्यांनी सांगितलं की, 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन राजापेठ येथे खासदार नवनीत राणा यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या सोबत केलेल्या अरेरावी, उध्दटपणा, अपमानकारक गैरवर्तणूक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून कायदेशिर कार्यवाही करावी अशी प्रमुख मागणी यावेळी केली.