Nitin Deshmukh : भाजपचे नेते इंग्रजांपेक्षा खराब, मराठी माणसांवर कारवाया करतात, देशमुखांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Nitin Deshmukh ACB Inquiry : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर (ACB) हजर राहणार आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार नितीन देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार आज आमदार देशमुख हे अमरावती (Amravati) इथल्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. "आपण शिंदे सरकारची चौकशी आणि कारवाईमुळे अजिबात डगमगणार नाही," असं नितीन देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना ठणकावून सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram