Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 फेब्रुवारी 2021 | मंगळवार | एबीपी माझा

Continues below advertisement
  1. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर संजय राठोड काय भूमिका मांडणार याकडे लक्ष, दोन आठवड्यांपासून गायब असलेले वनमंत्री आज पोहरादेवीत, समर्थकांकडून स्वागताची तयारी
  2. “संजय राठोडांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं” पोहरादेवीच्या पीठानं दिल्या सूचना, जितेंद्र महाराज यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली माहिती
  3. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, तर बुलढाण्यातील पाच शहरं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
  4. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
  5. मुलाच्या लग्नाचा शाही सोहळा धनंजय महाडिकांना पडला महागात, राज्यातील बड्या मंत्र्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर, महाडिकांवर गुन्हा दाखल
  6. लातूरच्या एमआयडीसीत एकाच वसतीगृहामध्ये 40 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
  7. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष होण्याची शक्यता, तर परीक्षा ऑनलाईनच घेण्याची शहरातील पालकांची मागणी
  8. सांगलीत महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक, भाजपचे आठ नगरसेवक संपर्कात नाही, तर काँग्रेसचे नऊ नगरसेवक नाराज असल्याची चर्चा
  9. माघी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न, पंढरपूरच्या मंदिराला आकर्षक रोषणाई, विठुराया गरुडावर तर रुक्मिणी कमळावर विराजमान
  10. Coronil औषध कोविड 19 वर प्रभावी असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा खोटा, इंडियन मेडिकल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram