लातूरमध्ये एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू
लातूरमध्ये काल दिवसभरात 64 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 40 रुग्ण हे एमआयडीसी भागातल्या एकाच वसतीगृहातील त्यामुळे आरोग्य विभागाची धावाधाव सुरू झाली आहे. दरम्यान हे विद्यार्थी अनेकांच्या संपर्कात आले आहेत, त्यांचा सध्या शोध सुरू आहे.