नाशिक : रामनवमी उत्सवाची सांगता, गरुड रथाची मिरवणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये रामनवमी उत्सवाची सांगता झाली. या सोहळ्यात महाआरती, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजर आणि रामाचा जयघोष करत गरूड रथाची मिरवणूक काढण्यात आली.
सोहळ्याच्या सुरूवातीला पादुकांची मिरवणूक काढली जाते. रथ मिरवणुकीला तब्बल 246 वर्षांची परंपरा आहे. त्यानंतर गरूडाच्या रथात पादुका ठेऊन आरती केली जाते. शहरातील काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघालेली रथयात्रा पुढे नागचौक, गणेशवाडीपासून गौरी पटांगणाकडे मार्गस्थ होते. या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून महिला भाविक रथाचे स्वागत करत मनोभावे दर्शन घेतात. या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता.