नाशिक: रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, पोलिसात तक्रार दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो वादात सापडला आहे. बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्याविरोधात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी बिग बॉसविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचं उल्लंघन करणारे असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.