नागपूर : नाणारवासियांचं आंदोलन, शिवसेना नेत्यांशी बाचाबाची
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपुरात गदारोळ झाला. विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध पाहायला मिळाला. विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना आमदारांसोबत आंदोलकांची बाचाबाची झाली. विधानभवनाबाहेर सकाळपासून सुरु असलेल्या नाणारवासियांच्या आंदोलनात शिवसेना आमदार, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर सहभागी झाले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्री पाठिंबा देण्यासाठी आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावरुन आंदोलक आणि शिवसेना नेत्यांमध्ये बोलाचाली झाली.