अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत, शेकडो प्रवाशांचा जीव वाचवणारा देवदूत!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईची लोकल ही खरं म्हणजे मुंबईची लाईफलाईन. या लोकलचं आणि मुंबईकरांचं घट्ट नातं. दररोज लाखो प्रवासी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी याच लोकल ट्रेनची सवारी करत असतात. या ट्रेनचा चालक अर्थात मोटरमन याचं काम अत्यंत जिकिरीचं तरीही दुर्लक्षित. खास करुन पावसापाण्यात रेल्वे ट्रॅक दिसत नसतानाही ही मंडळी डोळ्यात प्राण आणून ट्रेन चालवतात, आजच्या अंधेरीच्या घटनेवेळीही अशाच एका दक्ष मोटरमनने रेल्वेला अभिमानास्पद कामगिरी बजावलीय.