वडिलांच्या डोळ्यांसमोर 21 वर्षीय श्रद्धा चेंगराचेंगरीची बळी ठरली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 09:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एलफिन्स्टनच्या पादचरी पुलावरच्या दुर्घटनेनं मुंबईला दिलेली जखमी कधीच भरून निघणारी नाही. या दुर्घटनेत कुणी आपली मुलगी गमावली, कुणी आई गमावली तर कुणी जवळचा मित्र गमावला.... कल्याण जवळच्या विठ्ठलवाडीमध्ये राहणाऱ्या वरपे कुटुंबीयाने सर्वांच्या लाडक्या श्रद्धाला गमावलंय.. पाच मिनिटांसाठी श्रद्धा आणि तिच्या वडिलांची चुकामुक झाली आणि होत्याचं नव्हतं झालं..