मुंबई : आयसीआयसीआय बँकेतून ३ परदेशी कंपन्यांनी आपले समभाग काढून घेतले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jun 2018 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशातली सर्वात मोठी दुसरी खासगी बँक असलेली आयसीआयसीआय बँक दिवसेंदिवस खोलात जात आहे. व्हिडीओकॉन समुहाला दिलेल्या कर्जावरुन बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना व्यवस्थापकीय मंडळानं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मात्र त्यांच्या याच कारनाम्यांमुळे ३ बडे परदेशी गुंतवणूकदार कंपन्यांनी बँकेतील आपले समभाग काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आयसीआयसीआय बँकेपुढेच्या डोकेदुखी अजून वाढणार आहेत.