मुंबई | 154 PSI ना सरळ सेवेतून नोकरीत सामावून घेतोय, मुख्यमंत्र्यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2018 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमधील 154 पीएसआयबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. "या 154 जणांचं कुठलंही प्रमोशन नाही तर ते सरळ सेवेतून पीएसआय झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीत सामावून घेत आहोत," अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (23 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. "आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, 154 पीएसआयना ट्रेनिंग घेतल्यानंतरही एका न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करुन घेणं शक्य होत नव्हतं. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलंही प्रमोशन नाही. हे रेग्यूलर एक्झाममधून आलेले पीएसआय आहेत. त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेतलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत," असं मुख्यमंत्री म्हणाले.