मुंबई : चर्चगेट स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यांची हफ्ता वसुली, व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
मुंबईतल्या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं आंदोलन छेडलं आणि काहीकाळ रेल्वे स्टेशनभोवतीचे परिसर फेरीवालेमुक्तही बघायला मिळाले...मात्र, काही दिवसांतच पुन्हा फेरीवाल्यांनी स्टेशनपरिसरातच ठाण मांडायला सुरुवात केली...या अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेच्याच अधिका-यांचे अभय असते ही चर्चा खरं तर नेहमीच दबक्या आवाजात होते...मात्र, आता त्याचा पुरावा समोर आलाय...अनधिकृत फेरील्यांकडून हफ्ते घेतले जातात हे तुम्ही नेहमी ऐकलं असेल पण, भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांनी यांनी चर्चगेट स्टेशनजवळच्या भुयारी मार्गात या हफ्ते वसूलीचा थेट व्हिडीओच शुट केलाय.
Continues below advertisement