मुंबई : प्लास्टिकबंदीमुळे कॅफे मैसूरमधून अंबानींच्या घरी डब्यातून इडली-सांबारचं पार्सल

Continues below advertisement
प्लॅस्टिकबंदीमुळे खवय्यांची मोठी पंचाईत झाल्याचं बघायला मिळतं. मुंबईतील माटुंगा इथलं कॅफे मैसूर इथलं सांबर आणि चटणी खूप प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती उद्योगपती मुकेश अंबांनींसाठी दररोज इडली-सांबार-चटणी इथून पार्सल जातं. मात्र प्लॅस्टिकबंदीमुळे आज त्यांच्या घरुन स्टीलचे डबे आल्याचं हॉटेल मालकाने सांगितलं. याचबरोबर बहुतांश जणांना प्लॅस्टिकबंदीमुळे इडली-सांबार पार्सल न घेता रिकाम्या हाती परतावं लागलं. एकूणच सर्वसामांन्य ते श्रीमंतांना या प्लॅस्टिकबंदीचा फटका बसलाय.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram