कौल कर्नाटकचा : उद्याच बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टात काय झालं?
Continues below advertisement
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या सत्तेचा फैसला उद्या होणार आहे. शनिवारी 19 मे रोजी म्हणजे उद्याच बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सर्वोच्च न्यायालयाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिला आहे. कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठाने दीर्घ युक्तीवाद आणि सुनावणीनंतर हा निकाल दिला आहे. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून मुकुल रोहतगी बाजू मांडली.
Continues below advertisement