मुंबई : कांदिवली स्टेशनवर माथेफिरु चाकू घेऊन महिला डब्यात घुसल्याने खळबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एक इसम हातात चाकू घेऊन लोकलच्या महिला डब्यात घुसल्यानं कांदिवली स्टेशनवर काही काळ चांगलाच थरार पाहायला मिळाला. अचानक झालेल्या या घटनेनं महिला प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट पसरली. त्यानंतर हा इसम हातात चाकू घेतलेल्या अवस्थेत स्टेशनवरील ब्रिजवर जाऊन बसला. काही वेळानंतर अग्नीशमन दलाचे जवान, आरपीएफ आणि जीआरपीच्या टीमनं या इसमाला पकडलं. दरम्यान, अटक करण्यात आलेला हा इसम मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचं समोर आलं आहे.