कल्याण : चालत्या ट्रेनमधून तरुण खाली पडला, टीसीने जीव वाचवला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2018 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याण रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. तिकीट निरीक्षकाने दाखवलेल्या धाडसामुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे. संदीप सोनामा या तरुणाने लखनऊ पुष्पक एक्सप्रेस कशीबशी पकडली, पण ट्रेनमध्ये खुप गर्दी असल्यामुळे त्याला दरवाजातच जागा मिळाली. पण अचानक त्याचा तोल गेल्यामुळे तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये असणाऱ्या गॅपमध्ये सापडला. त्यावेळी तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला वाचवण्यासाठी पुढे धावले आणि त्याला तिथून बाहेर काढलं. त्यांच्या या धाडसामुळे अंबरनाथच्या कानसई प्रतिष्ठानतर्फे शशिकांत चव्हाण यांचा सत्कारही करण्यात आला आहे.