महाराष्ट्रासह नऊ राज्यांतील एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांची तारांबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशातील 9 राज्यांमध्ये चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशसह देशातील नऊ राज्यांत चलन तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील अनेक एटीएमबाहेर 'नो कॅश'चे बोर्डही लागले आहेत. अचानक एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रोकड असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.