इंदापूर : भुजबळांच्या सुटकेसाठी समर्थकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ इंदापूरमध्ये त्यांच्या समर्थकांनी भव्य मोर्चा काढला. तसंच पुणे सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या मोर्चात ओबीसी समाजासह इतर समाजाचेही अनेक नागरिक सहभागी झाले होते. छगन भुजबळ यांना मुद्दाम अडकवलं जात असून त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.