Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

Continues below advertisement

Vishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापाचे किरडू आढळल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील पळूस तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय.  पलूस  परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो.  यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ,तूरडाळ,गहू, तिखट,मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभार्थ्यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram