Harshavardhan Patil | कॉंग्रेसला रामराम करत हर्षवर्धन पाटलांच्या हाती कमळ | ABP Majha
Continues below advertisement
माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजप प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आमचा समाज अन्यायग्रस्त समाज आहे. अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ताकद द्यावी. मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे.
Continues below advertisement