गोंदिया : खेळताना अल्पवयीन मुलाकडून मित्राची गळा दाबून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2018 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चिचगड गावात २ अल्पवयीन मुलांमध्ये खेळताना झालेल्या भांडणातून एकाची हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे भागवत सप्ताहानिमित्त मंदिरात प्रवचनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी गावकऱ्यांसोबत लहान मुलंही मंदिरात जमली होती. पहाटे 3 च्या सुमारास 12 वर्षाचा पुष्कर परिहार आणि आरोपी मुलामध्ये खेळता खेळता भांडण झालं. यानंतर संताप अनावर झालेल्या आरोपी मुलानं पुष्करला गळा दाबला. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना एकाही गावकऱ्याचं लक्ष तिकडं गेलं नाही. जेव्हा प्रकार लक्षात आला तेव्हा उशिरा झाला होता. पुष्करला तातडीनं रुग्णालयतात दाखल करण्यात आलं. मात्र तो मृत पावला होता. दरम्यान अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.