HSC Result 2019 | बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा 7.85 टक्के अधिक आहे.यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला असून तो मागील वर्षापेक्षा 2.53 टक्क्यांनी घसरला आहे. यंदा कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
राज्यातील तब्बल 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
यंदा राज्यभरातून एकूण 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.