Zombivali Film: अमेय,ललित आणि वैदेही यांचा झोंबिवली प्रदर्शनासाठी सज्ज,सिनेमाच्या कलाकारांसोबत गप्पा
Zombivali : 'झोंबिवली' या मराठी चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील 260 सिनेमागृहात हा सिनेमा बुधवारी 26 जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉपीराईटच्या मुद्यावर सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या एका अन्य निर्मात्यानं प्रदर्शनाविरोधातील आपली मागणी सुनावणी अखेर मागे घेतल्यानं त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याच्या याचिकेवर 3 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.