Divya Bhatnagar Death | अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनानं निधन
टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्या गेल्या काही दिवसांपासून दिव्याची प्रकृती गंभीर असून ती झुंज देत होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती 34 वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्या भटनागर 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'गुलाबो' यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर न्युमोनिया झाला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी होत गेली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आहे.