Dilip Kumar | दिलीप कुमार थकले, त्यांच्यासाठी प्रार्थना करा : पत्नी सायरा बानो

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे, दिलीप कुमार आणि सायरा बानो. दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो नेहमी असतात. अशातच सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सायरा बानो यांनी सांगितलं आहे की, "दिलीप कुमार थकले आहेत. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे." एवढंच नाहीतर सायरा बानो यांनी सर्वांना दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सायरा बानो म्हणाल्या की, त्या दिलीप कुमार यांची काळजी कोणत्याही दबावापोटी घेत नाहीत, तर त्यांचं दिलीप कुमार यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्या त्यांची खूप काळजी घेतात. त्या पुढे बोलताना हेदेखील म्हणाल्या की, "लोकांनी माझं कौतुक करावं, यासाठी त्यांची काळजी घेत नाही. तर त्यांच्या सहवासात राहणं हे माझ्यासाठी सर्वात प्रिय गोष्ट आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि ते माझा श्वास आहेत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola