Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: मराठी भाषेवरून (Marathi Language) होणारं राजकारण (Maharashtra Politics) आणि सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा आहे, असं वक्तव्य बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता सनील शेट्टीनं (Sunil Shetty) केलंय. पण, त्यासोबतच मुंबईत (Mumbai News) राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, असंही सुनील शेट्टीनं अगदी निक्षून सांगितलं आहे.
एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) बोलताना बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं (Bollywood Actor Sunil Shetty) रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी बोलताना म्हणाला की, "मी खरंतर अभिनय नंतर शिकलो, पण नेहमीच वेळेवर येतो... टाईम मॅनेजमेंट स्किल्स आपोआप शिकलो... म्हणूनच मी 35 वर्ष झालीय टिकलोय... मी आज आलोय इथे... मी एबीपी माझाशी फार पूर्वीपासूनच जोडला गेलोय... नेटवर्क खूप असतात, पण फार कमी नेटवर्क परिस्थिती लक्षात घेऊन न्यूज सांगतात... मी इथे विभाचं नाव आवर्जुन घेईल, आपल्या सर्वांचं वैयक्तिक नुकसान झालंय... एबीपी म्हणजे, विभा आमच्यासाठी... ती एक अशी व्यक्ती होती, जी नेहमीच आमच्या दृष्टीकोनातून बातमी द्यायची, पण ज्यावेळी तिच्या निधनाची बातमी समजली, त्यावेळी मला खरंच असं वाटलं की, माझं वैयक्तिक नुकसान झालंय... "3
लग्न केल्यानंतर फिल्म करणार असं का ठरवलेलं? यावर बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, "मला माझ्या पार्टनरला इनसिक्योरिटी द्यायची नव्हती... नेहमीच तुम्ही पाहा, एखाद्या सेलिब्रिटीच्या कुटुंबात त्यांचे जे पार्टनर्स असतात, ते कुठेना कुठेतरी इनसिक्योर असतात... आपण कितीही नाही म्हटलं तरी असतेच... कारण अॅक्टर्स बाहेर असतात, त्यांच्यासोबत ग्लॅमर असतं, आसपास सुंदर मुली असतात... इनसिक्योरिटी असतेच, मला हेच द्यायचं नव्हतं... त्यावेळी मला अनेकांनी सांगितलं की, असं काही नसतं... लग्नानंतर बॉक्स ऑफिसवर परिणाम होतो, पण मला आजवरच्या कामात कळालंय की, तुमच्याकडे कॉन्टेन्ट असेल तरच बॉक्स ऑफिसवर परिणाम होतो..."