Suniel Shetty Maha Majha Katta : सुनील शेट्टीने सांगितला फिटनेस फंडा, डायटीशनचीही गरज नाही
माझा फिटनेस म्हणजे, नियमितपणा... : सुनील शेट्टी
वाढत्या वयात अगदी तरुणांना लाजवणाऱ्या रुपाचं सीक्रेट काय? याबाबत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, "लहानपणापासूनच खेळांची आवड आहे, मार्शल आर्ट्स लहानपणीच शिकलो अगदी पारंपरिक अंदाजात, ज्यामध्ये लाईफस्टाईल, डाएट, एकमेकांशी कसं वागावं, हेदेखील महत्त्वाचं आहे... मार्शल आर्ट्स मला हे शिकवायचं की, हे दाखवू नका की, तुम्ही कुणापेक्षा किती ताकदवान आहात, तर स्वतःवर नियंत्रण मिळवण्यासाठी... कदाचित यामुळेच मी हेल्थ ट्रिपवर गेलेलो... त्याचवेळी मला समजलं की, सात-आठ तास झोपल्यामुळे मला किती फायदा होतो... आपल्याला जे काही करायचंय, ते नियमितपणे आपण केलं की, तो तुमच्या डिएनएचा भाग होतो... माझा फिटनेस म्हणजे, नियमितपणा... मी सकाळी पाच वाजता उठतो, जिम जातो, व्यायाम करतो... मला कुणाशी कॉम्पिटिशन नाही करायचंय, पण मला माहितीय की, वाढत्या वयात शरीरासोबत काय होतं... मला तेच सुधारायचंय..."