Special Report | बाई, बूब्ज आणि ब्रा... हेमांगी कवीच्या पोस्टवरून चर्चा आणि ट्रोलिंग
मराठी अभिनेत्री हेमांगी कवीची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली आहे. ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात, असं हेमांगीनं म्हटलंय. हेमांगी कवीनं म्हटलं आहे की, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो! मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही!