Sitaare Zameen Par Trailer : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचा ट्रेलर
Continues below advertisement
Sitaare Zameen Par Trailer Aamir Khan: अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) बहुप्रतीक्षित ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वल आहे. नव्या कथानकासोबत आमिर खान (Aamir Khan latest film) पुन्हा एकदा सामाजिक विषय हाताळताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये भावनिक क्षणांसह प्रेरणादायी संदेश पाहायला मिळतो. या चित्रपटाची निर्मिती आणि मुख्य भूमिका आमिर खाननेच केली असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 20 जून 2025 रोजी 'सितारे जमीन पर' हा चित्रपट देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तारे जमीन पर’ प्रमाणेच हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या मनाला भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement