Saif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

Saif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून एका चोरट्यानं चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशातच 30 तास उलटून गेल्यानंतरही अजून पोलीस सैफच्या आरोपीला पकडू शकलेले नाहीत. अशातच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. पण, चौकशीनंतर हा तो आरोपी नसल्याचं सिद्ध झालं आहे. पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं, तो आरोपी नाही." त्यामुळे आता अजूनही आरोपीचा शोध सुरू आहे. 

सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून पळ काढणारा आरोपी फरार आहे. पोलिसांची तब्बल 20 पथकं गेल्या 30 तासांहून अधिक काळापासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली आहे. अशातच पोलिसांच्या हाती नवी माहिती लागली आहे, त्या दृष्टीनं पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. सैफ अली खानचा हल्लेखोर नालासोपारा -विरारच्या दिशेनं निघाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोर कोणत्या मार्गानं प्रवास करत आहेत, त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून वेगानं प्रयत्न सुरू आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola