Navratri 2022 Special: Rang Majha Vegala with Deepa Parab : पिवळ्या रंगाचं महत्त्व काय?: ABP Majha
Continues below advertisement
बहुतांश ठिकाणी पितांबर नेसलेली म्हणजे पिवळं रेशमी वस्त्र नेसलेली कृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. पिवळा रंग हा सौभाग्याचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जातो. विवाह सोहळ्य़ात वधूची अष्टपुत्री नावाची साडी पिवळ्या रंगाची असते. आणि विवाहापूर्वीचा हळद लावण्याचा सोहळा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अर्थात त्याच्या आत्ताच्या स्वरुपाबद्दल नको बोलुया पण हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच की नवरात्रीच्या निमित्ताने ज्या रंगाचे कपडे आपण 9 दिवस परिधान करतोय ते केवळ हौस किंवा ट्रेंड एवढ्यापुरतंच मर्यादित न ठेवता त्यामागचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. आणि तेच सांगण्याचा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
Continues below advertisement