Navratri 2022 Special: Rang Majha Vegala with Sayali Deodhar : आजच्या दिवसाचंं महत्त्व : ABP Majha

Navratri 2022 Special : शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होतेय... कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजलीत. साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलीय. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचं मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजलंय. सप्तश्रुंगी गडावर थोड्याच वेळात देवीच्या आभूषणाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन तुम्ही एबीपी माझावर घेऊ शकणार आहात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola