Pradeep Patwardhan Passes Away:मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला;अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Pradeep Patwardhan : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते  प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे आज (9 ऑगस्ट) हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी  राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडणारं आणि मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे प्रदीप पटनवर्धन. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या. चित्रपट, नाटक आणि मालिका यांमधून प्रदीप हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. 

 
 
 
 
 
 
 
 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola