Ratnagiri Rain Update : मध्यरात्रीपासून पावसाचा जोर, रघुवीर घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली : ABP Majha
कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाला आज रेड अलर्ट आहे... मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यााला पावसानं पुन्हा झोडपलंय... गुहागर, दापोली, खेड, चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रत्नागिरीच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक आहे... आणि पुढील दोन दिवस हा जोर वाढण्याची शक्यता आहे... मुसळधार पावसानं रघुवीर घाटात दरड कोसळली आहे... गेल्या महिन्याभरातली ही तिसरी घटना आहे.