Pawan Kalyan : टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण धावत्या कारखाली येताना थोडक्यात वाचले ABP Majha
चाहत्याची मिठी दाक्षिणात्य सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचे सर्वेसर्वा पवन कल्याण यांना चांगलीच महागात पडली असती. राजकीय रॅलीमध्ये धावत्या कारच्या टपावर उभे राहिलेने टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण चाहत्याच्या अतिउत्साहामुळे खाली पडणार होते. मात्र त्यांनी वेळीच स्वतःला सावरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि स्वतःच्याच कारखाली येण्यापासून ते वाचले. आंध्र प्रदेशात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. अतिउत्साही चाहता पवन कल्याण यांच्या कारवर चढला. या जबरा फॅनने त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल गेल्याने दोघेही पडले. पवन कल्याण गाडीवरच पडल्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली नाही.