Netflix Web Series : Money Heist चा रंजक प्रवास, सध्या का आहे 'मनी हाईस्ट'ची तुफान क्रेझ?

Continues below advertisement

Money Heist 5 : चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून 'जगप्रसिध्द चोरी' दाखवण्यात आलेल्या मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनचा पहिला भाग आज दुपारी रिलीज करण्यात आला. हा सीझन नेटफ्लिक्स (Netflix) वर दुपारी 12.30 वाजता रिलीज करण्यात आला. गेल्या 4 सीझनप्रमाणेच पाचवा सीझनही हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज करण्यात आला आहे. प्रश्न शेवटी पैशाचा आहे, त्यामुळे या जगप्रसिद्ध चोरीमध्ये प्रोफेसर पुढे काय शक्कल लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

 

दोन भागांत रिलीज होणार सीरिज 

 

मनी हाईस्ट एक क्राईम थ्रिलर वेबसीरीज आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते या वेबसीरिजची वाट पाहत आहेत. सीझनमध्ये 5 मध्ये एकूण दहा एपिसोड्स असणार आहेत. पण, हे एपिसोड दोन भागांत रिलीज केले जाणार आहेत. पहिला भाग 3 सप्टेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. परंतु, दुसऱ्या भागासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहवी लागणार आहे. दुसरा भाग 3 डिसेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram