Kamal Khan Arrested Special Report : अभिनेता कमाल खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी,काय आहे प्रकरण?

कायमच आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल राशिद खान अर्थात केआरकेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय... २०२० साली केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबईतील मालाड पोलिसांनी केआरकेला अटक केली... त्यानंतर त्याला मुंबईतील बोरीवली कोर्टात हजर करण्यात आलं. मालाड पोलिसांनी कोर्टाकडे केआरकेच्या चार दिवस कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय... न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर केआरकेनं जामिनासाठी अर्ज केलाय.. दुपारी ४ वाजता यावर सुनावणी होणार आहे.  गेल्या काही महिन्यांपासून केआरके हा सातत्याने बॉलिवूडबद्दल ट्वीट करत होता. अक्षय, आमिर यासारख्या बड्या स्टार्सच्या चित्रपटांबाबतही केआरकेने अशी बरीच टिवटिव केली... २०२०मध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान यांच्याबद्दल केआरकेने वादग्रस्त ट्विट केले होते. या प्रकरणी शिवसेना नेते राहुल कनाल यांनी २०२० साली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार केआरके दोन वर्षानंतर मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola