Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षानंतर भारताला 'ताज', 21 वर्षीय हरनाज संधू झाली मिस युनिवर्स
abp majha web team
Updated at:
13 Dec 2021 06:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMiss universe 2021 : चंदीगड गर्ल हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली आहे. 21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला. त्यानंतर हरनाजने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाज भारताची मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता.