Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान

Continues below advertisement

भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा 'माझा सन्मान पुरस्कार 2026' देऊन गौरव करण्यात आला. क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबरोबरच अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या कारकिर्दीची दखल घेत एबीपी माझाकडून हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना गावस्कर यांनी हा सन्मान क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. एबीपी माझा 'माझा सन्मान पुरस्कार 2026' सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री सई ताम्हणकर, गायिका प्रियांका बर्वे, ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे, उद्योगपती अरुण फिरोदिया, युवा उद्योजक अर्जुन देशपांडे, तसेच आदिवासी भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था यांना 'माझा सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आले. कला, क्रीडा, उद्योग, उद्योजकता, सामाजिक कार्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या या मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा हा सन्मान सोहळा एबीपी माझाच्या वतीने उत्साहात पार पडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola