Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

Continues below advertisement

Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

आपल्या अनोख्या स्टाईलने आणि 'भिडू' या शब्दाने संपूर्ण बॉलिवूडसह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. वय वाढलं तरी त्यांचा उत्साह आणि तरुणांना प्रेरित करण्याची त्यांची शैली आजही कायम आहे. जॅकी दादा कोणत्याही कार्यक्रमात जाताना नेहमी आपल्यासोबत एक छोटे झाड घेऊन फिरतात.

नुकत्याच झालेल्या एबीपी माझाच्या 'माझा सन्मान पुरस्कार 2026' या कार्यक्रमात (ABP Majha Sanman Awards 2026) त्यांनी यामागचे अत्यंत सुंदर कारण स्पष्ट केलं. यासोबतच त्यांना तरुणपणी भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी व्हायचं होतं, मात्र नशिबाने आणि वडिलांनी कुंडली पाहून दिलेल्या सल्ल्याने ते चित्रपटसृष्टीत 'हिरो' कसे बनले, याचा एक रंजक किस्सा शेअर केला.

एबीपी माझाच्या 'माझा सन्मान पुरस्कार 2026' या कार्यक्रमात (ABP Majha Sanman Awards 2026) महाराष्ट्रातील गुणीजन म्हणून ओळखले जाणारे सुनिल गावसकर, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, पंडित विजय घाटे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से समोर आणले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola