प्रशांत दामलेंच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट'ची '' यशस्वी घोडदौड, 14 मार्चला 400 वा विशेष प्रयोग

मुंबई : रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करत 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटकाचा प्रवास 400 व्या प्रयोगावर येऊन ठेपला आहे. या नाटकाच्या केंद्रभूमी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आहेत. तर या नाटकात कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अद्वैत दादरकरने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. 400 वा प्रयोग विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत 14 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola