Veteran actor Shrikant Moghe Passed Away | अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन

Continues below advertisement

पुणे : रंगभूमी आणि चित्रपटांची दुनिया गाजवणारे आणि अनेक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 91व्या वर्षी त्य़ांनी अखेरचा श्वास घेतला. 6 नोव्हेंबर 1929मध्ये किर्लोस्करवाडी इथं त्यांचा जन्म झाला होता.

'वाऱ्यावरची वरात' या नाटकातील त्यांच्या कामाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'तुज आहे तुजपाशी', 'गरुडझेप', 'लेकुरे उदंड जाहली' शिवाय 'मधुचंद्र', 'सिंहासन' या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. पुलं यांच्यासोबत ते जवळपास 50 वर्षे ते कार्यरत होते. श्रीकांत मोघे यांचा मुलगाही कलाविश्वात सक्रीय आहे, श्रीकांत मोघे हे अभिनेता शंतनू मोघे यांचे वडील.

कलाविश्वात नावारुपास येणाऱ्या या अनुभवी कलाकारानं दिल्लीत वृत्त निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. अतिशय कमी वयापासूनच कलाविश्वाळी नातं जोडलेल्या श्रीकांत मोघे यांच्या जाण्यानं अनेकांनीच हळहळ व्यक्त केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी या नटश्रेष्ठाला आपल्या परिनं श्रद्धांजली वाहत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram