Mumbai Drugs : NCB च्या रडारवर करण जोहर? 'त्या' व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चौकशीची शक्यता
एकीकडे आर्यन खान संदर्भातल्या घडामोडी सुरु असतानाच एनसीबीच्या रडारवर आणखी एक सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी निर्माता करण जोहरनं एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्या व्हीडिओची जोरदार चर्चाही झाली होती. व्हिडीओमध्ये डझनभर सेलिब्रिटी होते. त्यात दिसणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीनं ड्रग्ज घेतल्याचेही आरोप सुरु झाले. मात्र, नंतरच्या काळात व्हीडिओ मागे पडला आणि प्रकरणही.मात्र, आता एनसीबी याच व्हिडीओ प्रकरणी करण जोहरची चौकशी करण्याची शक्यता आहे.
Tags :
Mumbai Karan Johar Nawab Malik SHAH RUKH KHAN Vicky Kaushal NCB Sameer Wankhede Aryan Khan Samir Wankhede Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs